
उक्षी फाटा स्टॉपला अधिकृत मान्यता,गाव विकास समितिच्या मागणीला यश
रत्नागिरी:- उक्षी फाटा हा बस स्टॉपला अधिकृत मान्यता मिळाली आहे गाव विकास समितीच्यावतीने जिल्हा वाहतुक नियंत्रकांकडे मागणी करण्यात आली होती.गाव विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व उक्षी ग्रामस्थांनी जिल्हा वाहतुक नियंत्रकांची भेट घेऊन स्टॉप बसच्या मशीनमध्ये नसल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांची कल्पना दिली होती.गाव विकास समितीचे संघटनप्रमुख सुहास खंडागळे व अध्यक्ष उदय गोताड यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस डॉ.मंगेश कांगणे,महिलाध्यक्षा दिक्षा खंडागळे,उपजिल्हाध्यक्ष मुझम्मील काझी यांच्या सोबतच ग्रामस्थ जमातुल मुस्लिमीनचे सेक्रेटरी मुखत्यार काझी,अब्दुलमुनाफ खतीब यांनी जिल्हा वाहतुक नियंत्रकांची भेट घेऊन निवेदन दिले होते.उक्षी फाटा हा स्टॉप तर आहे पण तो बसच्या मशीनमध्ये नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.स्टॉप असुनसुद्धा प्रवाशांना एक ते दिड किमीवर असणाऱ्या वांद्री या स्टॉपला उतरावे लागत होते.पुढच्या स्टॉपचे जास्त पैसे द्यावे लागत होते.व तसेच उक्षी गावात रेल्वे स्टेशन आहे.तसेच या गावामध्ये प्रसिद्ध धबधबा, १० हजार वर्षांपुर्वीची कातळशिल्पे आहेत पण बस स्टॉप नसल्यामुळे प्रवाशांची व पर्यटकांची गैर सोय होत होती.यासाठी वेळोवेळी गाव विकास समितीचे उपजिल्हाध्यक्ष मुझम्मील काझी यांनी पाठपुरावा केला होता.अखेर गाव विकास समितिच्या मागणीला यश आले आहे.
www.konkantoday.com