अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपटांची निर्मिती केल्याबद्दल अटक
मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अँपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक केली आहे. सोमवारी पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली.
मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून मोबाईल अँपसवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात एका अभिनेत्रीला देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा यांचे नाव समोर आले होते. चौकशीसाठी राज कुंद्रा यांना बोलवण्यात आले होते. सोमवारी अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे.
www.konkantoday.com