
विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढल्याने सरकारी तसेच खासगी आयटीआयमधील एकेका जागेसाठी चढाओढ
अकरावी प्रवेशासाठी सीईटीची अट असली तरी राज्यातील आयटीआय अभ्यासक्रमाचे प्रवेश हे दहावीतील गुणांआधारेच होणार आहेत. त्यामुळे यंदा आयटीआय प्रवेशासाठी मोठी स्पर्धा रंगणार असून विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढल्याने सरकारी तसेच खासगी आयटीआयमधील एकेका जागेसाठी ‘चढाओढ पाहायला मिळणार आहे. राज्यात आयटीआय प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना दहावीची मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
www.konkantoday.com