
आता राऊतांविरोधात शिंदे गट रस्त्यावर ,संजय राऊत यांचा राष्ट्रवादीची अंतर्वस्त्र घातलेले बॅनर्स सगळीकडे
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्र बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरन आता राज्यात वातावरण चांगलेच तापत आहे.मुलुंडमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने अनोखी निदर्शने केली. या आंदोलनाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
संजय राऊत यांचा राष्ट्रवादीची अंतर्वस्त्र घातलेले बॅनर्स सगळीकडे लावण्यात आले आहेत. संजय राऊत यांच्या अंतर्वस्त्रावर राष्ट्रवादीच्या घड्याळाचे लोगो दाखवण्यात आले आहेत. आज संजय राऊत यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना शिंदे गटाने तीव्र निदर्शने करून संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. इतकंच नाही तर राऊतांच्या पोस्टरला जोडे मारुन घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. त्याचे पोस्टर फाडून आणि जोरदार घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला आहे. राऊतांच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशाराही शिंदे गटाने दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाची अंडरवेअर घालतात हे तपासायला हवं, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागले होते. यानंतर हा वाद आता आणखी चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. राऊतांच्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला होता. आता राऊतांविरोधात शिंदे गट रस्त्यावर उतरून निदर्शने करताना पाहायला मिळत आहे.
www.konkantoday.com