
लांजा बस स्थानकात प्रवाशांची कोरोना टेस्ट मोहीम,दोन प्रवासी पॉझिटिव्ह
लांजा तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी लांजा बस स्थानकात येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांची कोरोना टेस्ट मोहीम राबवण्यात आली. सकाळ सत्रात या मोहिमेत १०० हून अधिक प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात दोघे प्रवासी पॉझिटिव्ह आले.
लांजा नगरपंचायत, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम रविवारी सकाळी राबवण्यात आली.
www.konkantoday.com