राष्ट्रवादी विद्यार्थी आणि युवक काँग्रेसने रत्नागिरी शहरात आयोजित केली खड्डे चुकवा बक्षीस मिळवा स्पर्धा…
रत्नागिरी शहरातील सर्व रस्त्यांचे पूर्णपणे वाताहत झाली असून रस्त्याच्या खड्ड्यातून दुचाकी चालवत नेणे म्हणजे कसरत करण्यासारखेच आहे त्यामुळे अशा सहनशील रत्नागिरी करांसाठी
राष्ट्रवादी विद्यार्थी आणि युवक काँग्रेस कडुनआज “खड्डे चुकवा बक्षीस मिळवा हे”अनोखे आंदोलन राम नाका ते राधाकृष्ण नाका बाजारपेठ येथे करण्यात आले नागरिक रस्त्यावर असंख्य असलेले खड्डे चुकवू शकणार नाहीत याची आयोजकांनाही खात्री होती खड्डे चुकवता न आल्याने पुन्हा या नगरपालिकेतील भ्रष्ट सत्ताधार्यांना निवडून न देण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेस कडुन रत्नागिरीकरांना करण्यात आले रत्नागिरीकर नागरिकांना त्यांच्या सहनशीलते बद्दल गुलाब पुष्प देण्यात आली त्या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव श्री बंटी सदानंद वणजू जिल्हाउपाध्यक्ष श्री पप्पु तोडणकर, युवक शहर अध्यक्ष मंदार नैकर, युवक शहर कार्याध्यक्ष नागेश जागुष्ट्ये, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सुरज शेट्ये, विध्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष संकेत कदम, शहर विध्यार्थी अध्यक्ष साईजीत शिवलकर,प्रथमेश कांबळे सौरभ वायंगणकर, सुरज दळवी,निकिता वाघधरे,अक्षय मजगावकर,भुषण पवार श्रवण टकेल आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राज्यात सत्तेत असलेल्या महा विकास आघाडीच्या एका घटक पक्षाकडून हे आंदोलन करण्यात आल्याने त्याकडे लक्ष होते
www.konkantoday.com