रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर न केल्यास ठेकेदाराला चाबकाने फटकविणार -सचिनभाई कदम

मुंबई-गोवा महामार्ग गेले अनेक वर्ष चौपदरीकरणाच्या कामासाठी सर्वत्र उकरून ठेवला आहे. या महामार्गावर तसेच उपमार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अशावेळी वाहनधारकांना तसेच नागरिकांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत असून अनेकदा जीवावर बेतणारे प्रसंग घडत आहेत. याबाबत आपण यापूर्वी महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदाराला रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर न केल्यास चाबकाचे फटके देऊ, असा इशारा दिला आहे. त्याची आता अंमलबजावणी करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनभाई कदम यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button