रत्नागिरी तालुक्यातील गोळप मानेवाडी येथील पावसामुळे खचल्याने दोन कुटुंबांचे स्थलांतर
रत्नागिरी तालुक्यातील गोळप मानेवाडी येथील मोहिते कुटुंबीयांच्या घराजवळील जमीन मुसळधार पावसामुळे खचल्याने दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. या घरांना धाेका निर्माण झाल्याने त्यांना स्थलांतराची सूचना करण्यात आली हाेती. त्यानुसार दाेन्ही कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणची जमीन दहा ते पंधरा फुटाने खचल्याने एका घरातील तीन कुटुंबांना याचा धोका निर्माण झाला आहे
www.konkantoday.com