
जिल्ह्यात सरासरी ९२.७१ मिमी पावसाची नोंद,संगमेश्वर मध्ये सर्वाधिक पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये दापोली, लांजा, राजापूर वगळता इतर सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. संगमेश्वर मध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून तेथे १४२.३० मिलिमीटर पाऊस पडला आहे. २४ तासात सरासरी ९२.७१मिमी तर एकूण ८३४.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या २४तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड १०२.३० मिमी, दापोली ७०.८० खेड ९८.६० मिमी, गुहागर ११०.६०, चिपळूण ८३.६० मिमी, संगमेश्वर १४२.३०मिमी, रत्नागिरी ३३.३० मिमी, राजापूर ६०.३० मिमी, लांजा ६५.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून काजळी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
www.konkantoday.com