भटक्या-विमुक्त समाजांसह अन्य उपेक्षित वर्गामधील विखुरलेल्या कलाकारांना ‘कला विश्व’ व्यासपीठ

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने महाराष्ट्रासह देशांतील अनेक राज्यांतील भटक्या-विमुक्त समाजांसह अन्य उपेक्षित वर्गामधील विखुरलेल्या कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘कला विश्व’ नावाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत रविवारी वांद्रे-कु र्ला संकुल येथील परदेश भवनात झाले.
वाघ्या मुरळी, गोंधळ, वासुदेव किंवा दशावतार यांसारख्या पारंपारिक कलांची जोपासना करणाऱ्या कलाकारांना करोनाच्या काळामध्ये त्यांची कला सादर करता यावी आणि आर्थिक मदतही मिळावी यासाठी ‘कलाविश्व’चे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या १७ केंद्रांमधून दर महिन्याला २ किंवा ३ कार्यक्रम आभासी पद्धतीने सादर केले जातील. रविवारी मुंबई, पुणे आणि गोवा केंद्राद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कणकवलीचे कलाकार ओमप्रकाश चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दशावतार या नाटय़प्रकाराचे सादरीकरण के ले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button