
प्रवासी प्रतिसादानंतर एसटी महामंडळा कडुन ग्रामीण, शहरी,व लांब पल्याच्या मार्गावरील फेऱ्या सुरू
रत्नागिरी-कोरोनामुळे चाैथ्या टप्प्यातील शासकीय निर्बंध लागू असल्याने प्रवासी भारमानावर परिणाम झाला आहे. मात्र, प्रवासी प्रतिसादानंतर ग्रामीण, शहरी, लांब पल्याच्या मार्गावरील फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
अनलाॅकनंतर दि. १४ जूनपासून आंतरजिल्हा, ग्रामीण, शहरी मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. लाॅकडाऊनपूर्वी २५ रातराणी गाड्या सुरू होत्या. मात्र, अल्प प्रवासी प्रतिसादामुळे अवघ्या सात रातराणी बसेस सुरू आहेत.
अनलाॅकनंतर शहरी मार्गावर १८ फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे ३० गाड्यांद्वारे ७४ फेऱ्या सोडण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण, लांब, मध्यम पल्ल्याच्या मार्गावर सध्या १२९९ फेऱ्या सुरू झाल्या आहेत
www.konkantoday.com