प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली आतापर्यंत १,७६८ शेतकऱ्यांनी पीक क्षेत्राचा विमा उतरवला
शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत १,७६८ शेतकऱ्यांनी पीक क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गतवर्षी केवळ १,३०० शेतकऱ्यांनी या याेजनेचा लाभ घेतला हाेता. मात्र, यावर्षी ४६८ शेतकऱ्यांची वाढ झाली असून, या याेजनेसाठी मुदतवाढ देण्यात आल्याने ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दि. १५ जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी दि. ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com