
पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची नियुक्ती
पंजाब काँग्रेसमधील वादावर अखेर तोडगा निघाला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची नियुक्ती केली आहे. सोनिया गांधींनी याबाबतचं अधिकृत पत्रक काढूनच सिद्धूंच्या नियुक्तीची माहिती दिली आहे.पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर अमरिंदर सिंग यांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना यश आलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतलेला निर्णय सर्वांनाच मान्य राहील, असं मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होतं.
www.konkantoday.com