
मंडणगड शहरातील पालवणी फाटा येथे बंद फ्लॅट फोडून दागिने लांबवले
मंडणगड शहरातील पालवणी फाटा पोलीस तपासणी नाका येथील नथुराम प्लाझा इमारतीतील २०९ – क्रमांकाचा बंद प्लॅट फोडून चोरट्याने भरदुपारी ९.३ ग्रॅम वजनाच्या दागिन्यांसह ४ हजाराची रोकड लांबवली. हा प्रकार बुधवारी दुपारी २ ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान घडला असून भरदुपारी घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
या घटनेसंदर्भात फ्लॅटचे मालक विजय शशिकांत पिंपळकर (३७, मूळ बाणकोट, सध्या पालवणी फाटा, मंडणगड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पिंपळकर पिंपळी फाटा येथील नथुराम प्लाझा इमारतीत फ्लॅट क्र. २०९ मध्ये भाड्याने राहतात. बुधवारी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले असताना दुपारी २ ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान चोरट्याने फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील लोखंडी कपाटातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त करून आतील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरुन नेली. गात ४ ग्रॅम वजनाचे कानातल रिंग, मुलांचे २ ग्रॅम वजनाचे कानातले, ३.५० ग्रॅम वजनाची नथ हे सोन्याचे दागिने तसेच वाळे व कंबरेच्या साखळ्या ३ जोड, पैंजण २ नग असे चांदीचे दागिने लांबवले. तसेच सुमारे ४,००० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
www.konkantoday.com




