विक्रम जोशी याने आपले आणि रत्नागिरी चे नाव संपूर्ण भारतात उंचावले विक्रम जोशी याने पटकावले यंग सायंटिस्ट ॲवार्ड
डिआरपीआय या भारतीय संस्थेने आयोजित केलेलेल्या यंग सायंटिस्ट ॲवॅार्ड २०२१ या स्पर्धे मध्ये रत्नागिरी मधील जोशी मेडिकल्स चे डॉ चंद्रशेखर जोशी यांचे सुपुत्र विक्रम चंद्रशेखर जोशी याने नायपर -मोहाली या संस्थेमार्फत एम फार्म लेव्हल च्या स्पर्धे मध्ये उत्कृष्ट प्रेझेंटेशन करुन भारतात प्रथम क्रमांकाचे रु. ५००००/-चे बक्षिस व *यंग सायंटिस्ट ॲवार्ड २०२१ मिळवले .
फार्मसी क्षेत्रासाठी ही महान अचिव्हमेंट आहे, डॉ चंद्रशेखर जोशी हे रत्नागिरी मधील संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी या सामाजिक संस्थेचे सल्लागार असून सामाजिक क्षेत्रात ते सतत अग्रेसर असतात, त्यांच्या सुपुत्राने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com