
राजापूर शहरातील बंदरधक्का परिसर विकासासाठी प्रस्ताव -नगराध्यक्ष खलिफे
राजापूर शहरातील बंदरधक्का येथील अर्जुना-कोदवली नद्यांचा संगम परिसर (ठिकाण) पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी राज्याच्या पर्यटनमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे पर्यटन विकास योजनेंतर्गत २५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केल्याची माहिती नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांनी दिली. त्याला तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना जिल्हाधिकार्यांना तत्काळ प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्या आहेत. www.konkantoday.com