
चिपळूण बाजारपेठेत व्यापारी व कामगारांची कोरोना चाचणी मोहीम
चिपळूण शहरासह तालुक्यात अजूनही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात नाही. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी कोरोना चाचणीवर अधिक भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शनिवारी येथील बाजारपेठेत व्यापारी व कामगारांची कोरोना चाचणीसाठी मोहीम राबविण्यात आली. त्याला व्यापारी व कामगारांनी सहकार्य केले.
www.konkantoday.com