
निधीची लय लूट, जि.प.च्या नव्या इमारतीचा आणखी २० कोटींचा प्रस्ताव
रत्नागिरी जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेची सध्याच्या प्रशासकीय इमारतीच्या पाठिमागील भागात ५८ कोटी रुपयांच्या प्रशासकीय निधी मंजुरीनंतर सहा मजली नवीन प्रशासकीय इमारत एक प्रकारे कॉर्पोरेट लूकमध्ये उभी केली जाणार आहे. सध्या या नव्या इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. पण या ५८ कोटींच्या प्रशासकीय निधीमध्ये आता आणखीन तब्बल २० कोटींचा वाढीव प्रस्ताव तयार करून तो राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेची बहुमजली असलेल्या नवीन इमारतीचे बांधकाम फाऊंडेशननंतर मोठ्या गतीने सुरू आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेची १९६२ ला स्थापना होवून येथे प्रशासकीय कारभाराला प्रारंभ झाला होता. आज जिल्हा परिषदेची प्रशासकीय कारभार सुरू असलेली तीन मजली भव्य इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे या इमारतीला पर्याय म्हणून नवीन प्रशासकीय इमारत उभारणीच्या कामाला चालना देण्याचा निर्णय मागील सत्ताधार्यांनी घेतला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा मानल्या जाणार्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे, योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचवल्या जातात. अशा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात अधिक गतीमानता आणण्यासाठी जि.प.ची इमारतही प्रशस्त असावी, यासाठी मागील सत्ताधार्यांनी पाऊल उचलले होते.
www.konkantoday.com