
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र व्यक्तींनी राज्य महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी– शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय रत्नागिरी मार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र व्यक्तींचा सर्वांगिण कल्याण व विकासासाठी स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने अर्थसहायाच्या थेट कर्ज योजना, 20 टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना अशा विविध योजना महामंडळामार्फत राबविण्यात येतात.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रे आवश्यक आहे. सदर योजना लाभ घेण्यासाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
योजनेच्या अधिक माहितीकरीता जास्तीत जास्त इतर मागासवर्गीय नागरिकांनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, पाटबंधारे स्टॉप, कुवारबाव रत्नागिरी (दूरध्वनी क्रमांक 02352-228470) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक रत्नागिरी यांनी केले आहे.
www.konkantoday.com