
समयसुचकता दाखवुन स्वत:चा जीव धोक्यात घालुन ज्येष्ठ नागरीकाचा जीव वाचविणार्याचा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून सत्कार
तुडुंब भरून वेगाने वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या वृद्धाला वाचविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस अंमलदारांचा त्याच्या धाडसाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सत्कार करून कौतुक केले.
दिनांक १६ जुलै राजाराम आत्माराम घाग (८० वर्षे, रा. नायशी, हे संगमेश्वर) येथील कोंडीवरे धरण परिसरात रस्त्याने पायी जात असताना तोल जाऊन गड नदीच्या प्रवाहात पडले होते. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहाने ते नदीच्या मध्यभागी खेचले व पाण्यासोबत वाहत जावु लागले.
सदरची माहिती मिळताच माखजन दुरक्षेत्राचे अंमलदार प्रशांत शिंदे, महिला पोलीस शिपाई तेजस्वीनी गायकवाड तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पोलीस मित्र अमित कुंभार, तुकाराम कुंभार, किर्तीराज सागवेकर यांनी सर्वांनी आपला स्वत:चा जीव धोक्यात घालुन धोकादायक वाहणा-या नदीपात्रात उतरुन नदीपात्रत मध्यभागी झाडाला अडकून पडलेले राजाराम घाग यांना मदतीसाठी रस्सी पाठवून त्यांना नदीच्या प्रवाहातुन सुखरुप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.
पोलीस अंमलदार यांनी कर्तव्यतत्परता व समयसुचकता दाखवुन स्वत:चा जीव धोक्यात घालुन ८० वर्षाच्या जेष्ठ नागरीकाचा जीव वाचविल्याने डॉ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात गौरव चिन्ह देऊन सन्मानित केले
www.konkantoday.com