रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज २०२१ -२२ या सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार -नामदार उदय सामंत
रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजसाठी पावणेदोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. २०२१ -२२ या सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून, त्यासाठी ए. एस. आय. पी.ची मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षापासून ५ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार असून, यात मेकाट्रोनिक्स या नव्या अभ्यासक्रमाचा पहिल्यांदाच समावेश आहे. या प्रत्येक अभ्यासक्रमाची क्षमता ६० असेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
www.konkantoday.com