नदींच्या पात्रातून वाहून जाणार्या वृद्धाला स्वतःचा जीव धोक्यात घालून अमित कुंभार या तरूणाने जीवदान दिले
चिपळूण तालुक्यातील नायशी गावातील रहिवाशी राजाराम आत्माराम घाग हे सकाळी गावातून कोंडीवरे येथे चालत येत असताना पुलाशेजारी तोल जाऊन नदी पात्रात पडले.
प्रवाहासोबत वाहत जात असताना त्यांना नदी पात्रात झाड सापडले व त्या झाडाला पकडून ठेवले.व जिवाच्या आकांताने ओरडू लागले.स्थानिकांना कळताच राजाराम घाग याना वाचवण्यासाठी लोकांची धडपड सुरू झाली.नदी पात्र खोल असल्याने घाग यांना बाहेर काढण्यासाठी उत्तम पोहणाऱ्या माणसाची गरज होती.स्थानिकांनी लगेच माखजन कुंभारवाडी येथील अमित गोपाळ कुंभार याना बोलावून घेतले.पोहण्यात तरबेज असलेल्या अमित कुंभार यांनी धाडसी प्रयत्न करून नदी पात्रात झेप घेतली.अमित याने स्थानिकांच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने राजाराम घाग याना नदीपात्रातून बाहेर काढले.भर पावसात,पाण्याने ओसंडून भरलेल्यानदीपात्रात उडी मारून अमित कुंभार यांनी राजाराम घाग यांचे प्राण वाचवल्याने,अमित यांच्या वर अभिनंदन व कौतुक केले जात आहे
www.konkantoday.com