जग कोरोनाच्या तिसर्या लाटेकडे वाटचाल करत आहे-आरोग्य मंत्रालय
कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही, तोपर्यंत तिसर्या लाटेचा धोका वाढू लागला. येत्या काही दिवसांबाबत आरोग्य मंत्रालयाने इशारा दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, जग कोरोनाच्या तिसर्या लाटेकडे वाटचाल करत आहे. पुढील १००ते १२५दिवस फार महत्वाचे आहेत, या वेळी लोकांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. युरोप, अमेरिका, बांगलादेश, इंडोनेशिया, थायलंड आदी देशांत तिसरी लाट आली आहे. त्यामुळे आतापासून खबरदारी घेतली पाहिजे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
www.konkantoday.com