लसीचे दोन डोस घेतलेल्यांना महाराष्ट्र प्रवेशासाठी RTPCR चाचणी बंधनकारक नाही
कोरोना चा दुसरा डोस घेतलेल्यांसाठी आता देशांतर्गत विमान प्रवासासाठी RTPCR चाचणी बंधनकारक नसेल, महाराष्ट्रात येणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांना अशा RTPCR चाचणीची गरज नसेल असं राज्य सरकार च्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.फक्त दुसरा डोस घेतल्यानंतर किमान १५ दिवस पूर्ण झाले पाहिजेत.
राज्यातील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवासावर आणि इतर गोष्टींवर सरकारच्या वतीनं अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. आता प्रवासाच्या निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
www.konkantoday.com