लसीकरण केंद्रावर वाढता राजकीय हस्तक्षेप
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू आहे. आतापर्यंत ही लसीकरण मोहीम आरोग्य विभागाच्या अखत्यारित होती. मात्र, ग्रामीण स्तरापर्यंत अधिकाधिक लस पोहोचावी, या उद्देशाने ग्रामपंचायत आणि नगर परिषदांनी लसीकरण मोहिमेची धुरा खांद्यावर घेतली आहे. मात्र, सध्या मर्जीतील खास व्यक्तींनाच लस प्राधान्याने पुरवली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत दोन दिवसांपूर्वी कोकणनगर आरोग्य केंद्रावरही असाच वाद झाला होता सकाळी ६ वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर रांगा लावणाऱ्या नागरिकांना तासनतास तिष्ठत राहावे लागत असल्याने अनेक केंद्रांवर कर्मचारी आणि नागरिक यांच्यात वाद वाढले आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप होत आहे
www.konkantoday.com