रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या आणखी एकावेश्या व्यवसायाचा पोलिसांकडुन पर्दाफाश

काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरात एक सेक्स रॅकेट पोलिसांनी पकडले असतानआता रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या आणखी एकावेश्या व्यवसायाचा पोलिसांनीपर्दाफाश केला. शहरातीलनाचणे आय. टी. आय. रोडवरील एका इमारतीत धाड टाकूनपोलिसांनी पीडित मुलीसह दोघांना ताब्यात घेतले.पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली. नाचणे रोडवरील एका बिल्डींगमधील फ्लॅटमध्ये हा प्रकारसुरू होता. फ्लॅटमध्ये मुलींना बेकायदेशीररित्या ठेवून हाअनैतिक व्यवसाय चालू आहे अशी खबर रत्नागिरी शहरपोलीसाना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलीसअधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारेयांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी सदाशिव वाघमारे, शहरपोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी या ठिकाणी बोगस गि-हाईकपाठवून हा प्रकार उघड केला. अनैतिक व्यवसाय चालू आहेयाची खात्री पोलिसांना झाल्यानंतर पोलीसांनी छापा टाकला.
यावेळी त्या ठिकाणी तिथे एक पिडीत मुलगी व तिचेकडून वेश्याव्यवसाय करुन घेणारा इसम असे दोघेजण मिळून आले. यादोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीसांनी सदर इसमाकडे चौकशी केली असता त्याचे नाव माळी (४२, मूळ रा. सांगली ) असूनत्याच्या सोबत एका स्त्री साथीदाराचा देखील समावेश आहे. हेदोघे स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मुलींना बेकायदेशीर रित्याआणून व गि-हाईक आणून, वेश्या व्यवसाय करीतअसल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलीसांनी रावसाहेब
माळी व त्याची एक स्त्री साथीदार यांच्या विरुध्द शहर पोलीस
ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button