धोका पत्करून करोनाचा काळात काम केलेल्या नर्सिंग कॉलेजच्या ६२ मुलींना २ महिने पगार नाही
कोरोनाचा जिल्ह्यात कहर सुरू असताना आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी येथील डी. एस. फाऊंडेशन, परकार हॉस्पिटलच्या नर्सिंग कॉलेजच्या ६२ मुलींना सेवेत सामावून घेतले होते. मात्र या मुलींचा दोन महिने पगार न झाल्याने त्यांनी काम थांबविले आहे. याचा महिला रूग्णालयातील कोविड सेंटरवर मोठा परिणाम झाला आहे. येथे एक विभाग बंद पडल्याने गैरसोय निर्माण झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दोन महिन्यांचा त्यांचा सेवेचा कालावधी संपला आहे. म्हणून त्यांनी काम थांबविले आहे, अशी माहिती याबाबत जिल्हा रूग्णालय प्रशासनाने दिली आहे.
कोरोनाचा अतिसंसर्ग फैलावत असताना रत्नागिरीतील नर्सिंग कॉलेजच्या नर्सना प्रशिक्षण देवून सेवेत घेतले होते. दोन महिन्यांसाठी त्यांना सामावून घेतले होते. तो कालावधी संपला आहे. म्हणून त्यांनी काम थांबविले आहे. त्यांच्या पगाराचा विषय प्रक्रियेत असून लवकरच होईल असे डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी यांनी सांगितले.
www.konkantoday.com