दापोली शहरातील क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे, अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी करावी -आमदार योगेश कदम
दापोली शहरातील आझाद मैदान येथील क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून या प्रकरणी अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी करावी, अशी मागणी आपण राज्याचे क्रीडा आयुक्त यांच्याकडे केली असून दापोलीच्या क्रीडा संकुलासाठी एक बैठक घेण्यात यावी, अशी मागणी केली असल्याची माहिती दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.
आझाद मैदानात बहुउद्देशीय क्रीडासंकुल असावे, हे दापोलीकरांचे स्वप्न होते आणि त्यास मान्यताही मिळाली व २०१३ मध्ये या क्रीडा संकुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली. तीन वर्षात हे बांधकाम पूर्ण झाले होते. या क्रीडा संकुल इमारतीमध्ये व्यायामशाळेसाठी अत्याधुनिक साहित्य आणलेले होते. मात्र ते विनावापर धुळखात पडूनच आहे तसेच या इमारतीचे बांधकाम निकृष्ट झालेले असून इमारत आज मोडकळीस आली आहे. तत्कालीन जिल्हा व तालुका क्रीडा अधिकार्यांनी बांधकाम व साहित्य खरेदी या पलिकडे लक्षच दिले नाही व वापरात आणली नाही
.www.konkantoday.com