
खेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली; आरोग्य यंत्रणा हतबल
खेड तालुक्यात कोरोना आटोक्यात येतो आहे असे वाटत असतानाच ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत रस्त्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा हतबल झाली आहे. गेल्या चोवीस तासात तालुक्यात तब्बल ४८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून यामध्ये खाडीपट्ट्यातील पन्हाळजे बौद्धवाडी येथील २७ रुग्णांचा समावेश आहे. एकाच वाढीत एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ही वाडी सील करण्यात आली आहे.
गेले काही दिवस टाळूयात कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत होती. त्यामुळे तालुका प्रशासनासह आरोग्य यंत्रणाही काहीशी निश्चिन्त झाली होती. मात्र ग्रामीण भागात पुन्हा एकदा कोरोनाचा वणवा पेटताना दिसू लागला असल्याने कोरोनाला रोखण्यासाठी आता काय करावे हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. पन्हाळजे बौद्धवाडी प्रमाणे ऐनवरे या गावातही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या गावात दहा तर लोटे, खोपी, मेटे, निगडे या गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.
पन्हाळजे बौद्धवाडी येथे आढळून आलेल्या २७ रुग्णांमध्ये ३ रुग्णांचे वय ते १४ पेक्षाही कमी असल्याने आरोग्य यंत्रणेसह पालकांचीही चिंताही वाढली आहे. गेल्या काही दिवसात खेड तालुक्यात अनेक लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याची खबरदारी कशी घ्यायची हा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे.
www.konkantoday.com