
कोकण रेल्वेची हद्द ओलांडून दक्षिण रेल्वे मार्गावर पालघाट विभागात कुलासेखारा रेल्वे रुळावर दरळ कोसळल्यामुळे वाहतुक ठप्प
कोकण रेल्वेची हद्द ओलांडून दक्षिण रेल्वे मार्गावर पालघाट विभागात कुलासेखारा शुक्रवारी (ता. 16) रेल्वे रुळावर दरळ कोसळल्यामुळे वाहतुक ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरुन केरळकडे जाणार्या गाड्यांच्या वेळापत्रकावर झाला असून एक गाडी रद्द करण्यात आली आहे.
दक्षिण रेल्वेवरील पालघाट विभागात कुलासेखारा जवळ रुळावर दरड कोसळली आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या घटनेचा कोकण रेल्वे मार्गावरील नियमित वाहतूकीवर कोणताच परिणाम झालेला नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
www.konkantoday.com