केंद्रसरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू -राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक
केंद्रसरकारच्या माध्यमातून ट्वीटरवर अंकुश आणण्याचे काम सुरू झाले असून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतोय हे योग्य नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
ट्वीटर हे असे माध्यम होते ज्यावर लोकं निर्भिडपणे आपली बाजू मांडत होते. सत्य परिस्थिती लोकांसमोर आणत होते. मात्र ज्यापध्दतीने देशभरात इतर माध्यमांवर अंकुश ठेवण्याचे काम केंद्रसरकारच्या माध्यमातून होत आहे. त्याचपध्दतीने ट्वीटरवर अंकुश ठेवला जाणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
www.konkantoday.com