सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांना लागू असणा-या विविध योजनांबाबत वेबिनारचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी सीए ब्रँचतर्फे आणि बँक आँफ इंडिया रत्नागिरी झोनल आँफिस व रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्र यांच्या सहकार्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) यांना लागू असणा-या विविध योजनांची माहिती देण्याकरिता मोफत वेबिनारचे आयोजन केले आहे. १७ जुलैला संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत वेबिनार होणार असून नोंदणी अत्यावश्यक आहे.

केंद्र व राज्य सरकारी योजना, तसेच सबसिडी व इन्सेंटिव स्कीम, समाधान योजना यासंबंधी वेबीनारमध्ये तज्ञ माहिती देणार आहेत.

यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना यांचीही माहिती मिळेल. तसेच जागा मिळवण्यासाठीच्या कार्यपद्धतीची माहिती मिळेल. बँकेच्या विविध कर्ज सहायता योजना यासंबंधी प्रत्यक्ष बँक अधिका-यांकडून मार्गदर्शन मिळेल. तसेच प्रश्नोत्तरांच्या सत्रामध्ये शंकासमाधान करून घेण्याची संधी मिळेल.

१७ जुलै रोजी संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत झूम आणि यूट्यूबद्वारे वेबिनार होईल. यामध्ये सीए महेश्वर मराठे, संतोष कोलते, प्रशांत पाडळकर, कुमार प्रमोद सिंह वरील विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

नावनोंदणी करणा-यांनाच या वेबीनारची लिंक देण्यात येईल.
नोंदणीसाठी लिंक
https://bit.ly/3egUkif

जास्तीत जास्त इच्छुकांनी यात नोंदणी करावी, असे आवाहन सी.ए. ब्रँच अध्यक्ष सीए आनंद पंडित आणि बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर केशव कुमार यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button