विधानपरीषदेवर निवडून जाणाऱ्या दोन ‘भाईना’पुन्हा संधी मिळणार ?
मुंबई महानगर पालिकेतून विधानपरीषदेवर निवडून जाणाऱ्या दोन जागांसाठी डिसेंबर महिन्यात निवडणुक होणार आहे. या निवडणुकीत सध्याच्या संख्याबळानुसार काँग्रेसचा उमेदवार निवडून येणे अवघड आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचे विधानसभा सदस्य पद धोक्यात आले आहे. तर,शिवसेनेचे भाई म्हणजे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनाही पुन्हा उमेदवारी मिळणार का हा प्रश्न आहे त्यामुळे पालिकेतील भाई गिरी संपणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
www.konkantoday.com