बारावीच्या विद्यार्थीनीला गुण वाढविण्याच्याबदल्यात शरीरसुखाची मागणी करणार्‍या कॉलेज कर्मचाऱ्याची धिंड

पुणे – मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवत बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थिंनीकडे कॉलेजमधील एका कर्मचा-याने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील नामांकित महाविद्यालयात घडला आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर विद्यार्थिनीच्या घरच्यांनी संबंधित कर्मचा-याला चोप देत बुधवारी (ता. १४) त्याची महाविद्यालय ते पोलिस ठाण्यापर्यंत काळे फासत धिंड काढली. कर्मचा-याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात विनयभंग व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित पवार असे या कर्मचा-याचे नाव आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button