न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिमन (PCV) लसीकरण कार्यक्रमाबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीम.इंदुराणी जाखड यांच्या दालनात बैठक
आज मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीम.इंदुराणी जाखड यांचे दालनात न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिमन (PCV) लसीकरण कार्यक्रमाची सभा घेण्यात आली.
या सभेत जिल्ह्यामध्ये न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिलनचा (PCV) लसीकरण अंतर्गत नियमित लसीकरणामध्ये समावेश करण्यात येत आहे. ही लस न्यूमोकोकस या जीवाणूमुळे होणाऱ्या न्युमोनिया आणि मेनिजायटिसपासून बालकाचे रक्षण करेल. न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सियन (PCV) लस ही अतिशय सुरक्षित लस असून दीड महिना (6 आठवडे), साडेतीन महिने (14 आठवडे) व 9 महिन्यांपर्यंतच्या बालकांना या लसीच्या मात्रा देण्यात येणार आहेत. आणि इतर कोणत्याही लसीप्रमाणे ही लस दिल्यावर बालकाला सौम्य ताप येऊ शकतो किंवा इंजेक्शन टोचलेली जागा लालसर होऊ शकते. जेव्हा तुमच्या बालकाला पीसीव्ही लस देण्यात येईल त्याचवेळी वेळापत्रकानुसार लागू असलेल्या अन्य लसी देखील देण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पीसीव्ही लसीचे एकुण 1100 डोस प्राप्त झाले असून त्याचे वाटप प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर करण्यात आल्याचेमा.डॉ.श्री.अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीम.इंदुराणी जाखड यांनी न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सि न (PCV) लस आजपासून नियमीत लसीकरणामध्ये समावेश करण्यात येत असल्याचे सांगितले. व पीसीव्ही ही देण्यात येणारी लस विनामुल्य असल्याचे सांगून नागरिकांनी आपल्या बालकांना देण्याचे आवाहन केले.
सदरच्या सभेला मा.श्री.योगेश जवादे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी, मा.डॉ.श्री.दिलिप माने अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, मा.डॉ.श्री.चौधरी अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, मा.डॉ.श्रीम.देशमुख अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, मा.डॉ.श्री.चंद्रकांत शेरखाने निवासी वैद्यकीय अधिकारी, मा.डॉ.श्री.दिनेश सुतार माता व बाल संगोपन अधिकारी, जि.प.रत्नागिरी, मा.डॉ.श्री.सतिश गुजलवार जिल्हा सर्वेक्षण अधिकारी जि.प.रत्नागिरी हे उपस्थित होते.
www.konkantoday.com