
न्यायालयीन कामकाजासाठी केवळ लेजर पेपर वापरण्याची अट बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द
न्यायालयीन कामकाजासाठी केवळ लेजर पेपर वापरण्याची अट बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली. तसेच ए-4 आकाराचा पांढऱ्या रंगाच्या कागदाचा वापर करण्यास तसेच कागदाच्या पाठपोट प्रिंटिंगलाही (दोन्ही बाजूंनी करण्यास) हायकोर्टानं परवानगी दिली आहे. हे आदेश मुंबईसह, नागपूर, औरंगाबाद, गोवा खंडपीठ आणि सर्व कनिष्ठ न्यायालयांनाही लागू असतील. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे वकिलांना तसेच पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेली वर्षानूवर्ष न्यायालयातील कामकाजासह अर्ज अथवा याचिका या हिरव्या रंगाच्या मोठ्या लीगल पेपरवरच दाखल कराव्या लागत होत्या.त्यामुळे न्यायालयात ही कागदपत्रं त्यांच्या नोंदी, फाइल्स इत्यादींची साठवणूक करण्यास फार अडचणी येत होत्या. हीच बाब निदर्शनास आणणारी जनहित याचिका अँड.अजिंक्य उडाने यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
www.konkantoday.com