नाना पटोले पहिल्यांदा बोलतात,नंतर म्हणतात, माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला -नवाब मलिक यांचा टोला
२०१४ साली राष्ट्रवादीने आम्हाला धोका दिला त्यामुळेच आम्ही स्वबळाची भाषा करत आहोत, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, “नाना पटोले पहिल्यांदा बोलतात, बातम्या सुरु होतात. परंतु ते त्यानंतर सांगतात की, माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. त्यामुळे आता ते काय बोलले हे मी ऐकलं नाही.” अशी खोचक प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली. मागील काही दिवसांत नाना पटोले यांनी महाविकास आघाडी मध्ये नाराजी निर्माण होईल, अशी वक्तव्य केली होती.
www.konkantoday.com