
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवमानप्रकरणी चिपळुणात ३० रोजी बौद्ध समाजाचा जन आक्रोश.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला अवमान आणि परभणी येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी तमाम आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरणार आहेत. दोषींवर कारवाई करावी, या मागण्यांकडे राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील बौद्ध समाजातील सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय संघटना यांच्यामार्फत सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वा. जन आक्रोश आंदोलन छेडले जाणार आहे. या विराट मोर्चात हजारो भिमसैनिक सहभागी होणार आहेत.दिल्ली येथील संसद भवनात दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारत देशाचे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जाणुनबुजून अवमानीत करणारे भाष्य करून अखंड भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. आपल्या उद्धारकर्त्याची अवहेलना करणार्या या व्यक्तीला संसदेतून व गृहमंत्री पदावरून निलंबित करण्यात यावे अशी आंबेडकरी अनुयायांची मागणी आहे.www.konkantoday.com