बदलापूरच्या “त्या” विकृताच्या घराची नागरीकांनी केली तोडफोड

बदलापूर: बदलापूरमधल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी शाळेत सफाई कामगार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान, आरोपी अक्षय शिंदे यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. ज्या गावात तो राहात होता, तिथल्या त्याच्या घराची काही अज्ञात लोकांनी ही तोडफोड केली असून अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनाही गावातून बाहेर काढण्यात आलं आहे. बदलापूरमधल्या खवई या गावात अक्षय शिंदेचं घर आहे. मिळालेल्या माहितीनुसार घराला बाहेर कुलूप होतं, पण लोकांनी घराच्या काचा फोडून आतल्या सामनाची तोडफोड केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button