किमान मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी-शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे
परीक्षा आणि निकालांसोबत प्रवेश आदी प्रक्रिया करण्यासाठी किमान मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सरकारकडे एक पत्र लिहून केली. कायंदे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, मदत व पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहले. कोरोनाचा धोका लक्षात घेता ट्रेन्स सर्वसामान्यांसाठी बंद आहेत याची कल्पना आहे. पण विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निकालासंबंधी काम करण्यासाठी तरी किमान लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली.
www.konkantoday.com