काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळात खासगी कामासाठी सरकारी पैशाने विमान प्रवास,२८ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश
काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळात खासगी कामासाठी सरकारी पैशाने विमान प्रवास केल्याचा आरोप भाजपने केला होता. या प्रकरणी भाजप नेते विश्वास पाठक यांच्या याचिकेला उत्तर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. नितीन राऊतांना २८ जुलैपर्यंत उत्तर देण्यास हायकोर्टाने सांगितलं आहे. विमान प्रवासासाठी सरकारी तिजोरीतून खर्च केलेली रक्कम परत करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती पाठक यांनी याचिकेत केली आहे.
www.konkantoday.com