
गोकुळमध्ये अखेर तीन दशकांनंतर सत्तांतर झाले, सतेज पाटील यांच्या आघाडीने निवडणुकीत बाजी मारली
कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण ज्या गोकुळ दूध संघाच्या अवतीभवती फिरत त्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. गोकुळमध्ये अखेर तीन दशकांनंतर सत्तांतर झालं आहे. सतेज पाटील यांच्या आघाडीने निवडणुकीत बाजी मारली आहे.
सतेज पाटील यांच्या आघाडीला २१ पैकी १७जागांवर विजय मिळाला आहे. सत्ताधारी महाडिक गटाला केवळ ४ जागांवर समाधान मानावं लागलं. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता आता संपुष्टात आली आहे.
www.konkantoday.com