आता गोवेकरांनाही मोफत वीज देण्याची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
आता गोवेकरांनाही मोफत वीज देण्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. गोव्यात २०२२ साली होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या गोवा दौऱयावर असून त्यांचा आम आदमी पक्ष (आप) आगामी विधानसभा रिंगणात उमेदवार उतरवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, गोव्यात २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आपचे सरकार आल्यास प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला ३०० युनिट वीज मोफत दिली जाईल. विजेची जुनी बिले माफ केली जातील. २४ तास वीज उपलब्ध असणार आहे तसेच शेतकऱयांना शेतीसाठी मोफत वीज मिळेल, अशी घोषणा केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.
www.konkantoday.com