स्वबळावर लढायचं हाच आमचा आणि पक्षाचा अजेंडा-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आपल्या स्वबळाचा नार्‍यावर अजूनही ठाम आहेत नाना पटोलेंच्या ‘स्वबळा’ची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी तसंच शिवसेनेकडून सूचनावजा इशारा मिळूनही ते आपल्या स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती स्वबळावर लढायचं हाच आमचा आणि पक्षाचा अजेंडा असल्याचं भाष्य पटोले यांनी केले आहे
*नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे आणि तुम्हाला भविष्यात त्याचे परिणाम नक्की पाहायला मिळतील. आम्ही जी दिशा घेऊन काम करत आहोत, त्यावरुन महाराष्ट्रात काँग्रेस ही एक नंबरची पार्टी आहे हे तुम्हाला येणाऱ्या २०२४च्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.”
स्वबळाच्या मुद्द्यावरुन पुनर्विचार करणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “नाही, हा निर्णय पक्षाच्या पातळीवर घेण्यात येईल. मी फक्त एवढंच सांगेन की, काल पवारांनी जे वक्तव्य केलं, तसाच निर्णय त्यांनी २०१४ मध्येही घेतला होता. तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय़ होता. आमच्या पक्षाचाही काय करायचं, कसं करायचं याबद्दलचा निर्णय होईल. ती आमच्या पक्षाची रणनीती असेल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button