
स्वबळावर म्हणजे स्वत: चालत येऊ’- मुख्यमंत्र्यांचा नाना पटोले यांनाअप्रत्यक्ष टोला
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देऊन एकच चर्चेचा धुरळा उडवून दिला होता. तर ‘कोरोनाची भीती बाळगू नका, बाळासाहेब, आम्हीही स्वबळावर येऊ, स्वबळावर म्हणजे चालत येऊ’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या स्वबळावर भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या टोलेबाजीमुळे सभागृहात एकच हशा पिकली.
मुंबईमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार , जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अशोक चव्हाण , पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत होते.स्वबळाच्या नारेबाजीवरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व्यासपीठावरून टोला लगावला. ‘आता जेवणाचा विषय निघाला चांगलं झालं, कोरोनाची भीती बाळगू नका बाळासाहेब, आम्ही सुद्धा स्वबळावर येणार, स्वबळावर म्हणजे आम्ही स्वतः चालत येऊ, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहत नाना पटोले यांना टोला लगावला.
www.konkantoday.com