शिवसेनेच्या विदर्भातील आमदारांने नाराजी व्यक्त केली
सत्तेत असलेल्या शिवसेनेतील आमदारांमध्ये मंत्रीपदावरून मोठी धुसफूस होत आहे. विदर्भातील एका आमदाराने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदं मिळाली, पण ४ वेळा निवडून येऊन देखील आम्हाला डावलले जात आहे. अशी नाराजी शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिवसेनेत खिंडार पडणार का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आला आहे. काल शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी देखील राजीनामा दिला आहे.
www.konkantoday.com