
पोलीस शिपाई भरती, लेखी परीक्षा शांततेत
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १४९ पोलीस शिपाई पदासाठी रविवारी लेखी परीक्षा शांततेत पार पडली. शहरातील ५ सेंटरवर ही परीक्षा घेण्यात आली असून सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची झुंबड पहावयास मिळाली. शारिरीक चाचणी परीक्षेत ५० टक्के गुण मिळविलेल्या उमेदवारांचीच निवड लेखी परीक्षेसाठी केली होती. त्यानुसार १ हजार ६३४ उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरले.शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे ५२४, मेस्त्री हायस्कूल येथे २२०, श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय येथे ३३६, गंगाधर गोविंद पटवर्धन हायस्कूल (जीजीपीएस) येथे ९८ तर शिर्के हायस्कूल येथे ४३८ महिला उमेदवारांच्या लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. www.konkantoday.com