रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी निलंबित
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी बालाजी विठ्ठल कटेलवाड यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले आहेत. निलंबनाच्या कालावधीत श्री. कलेटवाड यांनी दापोली पंचायत समिती मुख्यालयात हजर रहावे, असे सदर आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी श्री. कलेटवाड यांच्या गैरकारभाराचा पंचनामा करून निलंबनाची मागणी केली होती.
www.konkantoday.com