
रत्नागिरी उपपरिसराच्या विद्यार्थ्यांची युवा महोत्सवात चमकदार कामगिरी
रत्नागिरी- मुंबई विद्यापीठांगर्त येणा-या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर उपपरिसरच्या विद्यार्थ्यांनी 54 व्या युवा महोत्सवात घवघवीत यश संपादन केलंय..एकुण चार कलाप्रकारात या उपपरिसराच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलंय मुंबई विद्यापिठाच्या यावर्षी ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी संपन्न झाली…यात सात प्रकारात रत्नागिरी उपपरिसराच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यातील तीन प्रकारत प्रथम क्रमांक तर एका प्रकारात तृतीय क्रमांक विद्यार्थ्यांनी प्राप्त केलाय.. स्टोरी टेलिंग प्रकारात साक्षी चाळके हिने प्रथम क्रमांक पटकावलाय, मोनो अँक्टींग प्रकारात सनम दातेंने प्रथम क्रमांक, इलॉकेशन अर्थात वक्तृत्व स्पर्धेत ऋजुदा जाधव हिने प्रथम क्रमांक तर ऑन द स्पॉट पेंटिंग या कला प्रकरात हर्षदा मेस्त्री हिने तृतीय क्रमांक प्राप्त केलाय.
या विद्यार्थ्यांना तांत्रिक सहकार्य हे रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचं लाभलं असून डॉ आनंद आंबेकर यांचं देखील सहकार्य ह्या विद्यार्थ्यांना लाभलंय..तसेच तांत्रिक मार्गदर्शन शुभम पांचाळ यांनी केलं.. रत्नागिरी उपपरिसराचे प्रमुख डॉ किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाचे प्रा निलेश रोकडे, प्रा. आरती दामले आणि प्रा अश्विनी जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं..या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन डॉ किशोर सुखटणकर यांनी केलं..