पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा, यासाठी डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु -प्राचार्य जाधव
पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा, यासाठी डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांच्या छायांकित प्रती अपलोड करणे, त्यासह कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत आहे, अशी माहिती प्राचार्य औदुंबर जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या २०२०-२२ शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले. दहावीच्या निकालाची वाट न पाहता पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थ्याला ऑनलाईन अर्जामध्ये केवळ बैठक क्रमांक नोंदवायचा आहे. उमेदवाराने राज्य मंडळाच्या २०२१ मध्ये दहावी परीक्षेत प्राप्त केलेले गुण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्राप्त होणार्या निकालाची माहिती भरून थेट घेण्यात येतील. ते संबंधित विद्यार्थ्याच्या अर्जामध्ये दर्शविण्यात येणार आहेत. २३ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदत देण्यात आल आहे. वेळापत्रकानुसार अर्ज भरणे, कागदपत्र, तपासणी, अर्ज निश्चिती आणि अंतिम गुणवत्ता यादी ही सर्व प्रक्रिया ३० दिवसांची असणार आहे.
यंदापासून पॉलिटेक्निकमध्ये मेकॅट्रॉनिक्स हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता प्रथम वर्षासाठी ६० आहे. या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत रोबोटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर इंजिनिअरींग, सिस्टिम इंजिनिअरींग कंट्राल इंजिनिअरींग अशा विविध शाखांमधील महत्वाच्या घटकांचा समावेश केला आहे.
www.konkantoday.com